हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर उचल करून पेरणी करण्याचे आवाहन

हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदानावर उचल करून पेरणी करण्याचे आवाहन

भंडारा, दि. 12 : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण या घटकांर्तगत जिल्ह्यामध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रती किलो अनुदान देय आहे. सदर योजनेंतर्गत देण्यात येणारे हरभऱ्याचे वाण हे 10 वर्षाच्या आत प्रसारीत झालेले प्रमाणित वाण असून मर रोगाला प्रतिकारक आहे. या नवीन वाणात पुर्वीच्या वाणापेक्षा 10 ते 15 टक्क्याने जास्त उत्पादन क्षमता असून आपल्या विभागासाठी हे वाण अनुकूल आहे.

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात या वाणाची पेरणी करावी. याकरीता तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज करून परमिट घ्यावे व बियाण्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी केले आहे.