जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त
लाखनीत एक क्रियाशील रुग्ण
- आज 01 रुग्णाला डिस्चार्ज
- कोरोना पॉझिटिव्ह 00
- आजच्या टेस्ट 432
- एकूण टेस्ट 460330
भंडारा,दि.26:- जिल्ह्यात आज कोरोनाच्या एका रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सहा तालुके कोरोनामुक्त झाली आहेत. केवळ लाखनी तालुक्यात एक क्रियाशील रुग्ण उरला आहे. आज 432 चाचण्या झाल्या असून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली व लाखांदूर तालुक्यात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जिल्ह्यात आता 01 सक्रिय रुग्ण आहेत.
आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58959 झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60093 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 60 हजार 330 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60093 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60093 झाली असून 01 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.88 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
- कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस आवश्य घ्यावी.
- जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
- सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.