इयता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणत्र अर्ज जुलै पासून स्विकारणार
भंडारा, दि.13:- शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये इयत्ता 12 वी मध्ये विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज माहे जुलै 2021 पासून स्विकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सीसीव्हीआयएस या संकेतस्थळावर अर्ज भरावे व अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. सीसीव्हीआयएस या संकेतस्थळावर अर्ज भरण्यापूर्वी संबंधित महाविद्यालय यांचे कडून इयत्ता 12 वी मध्ये शिकत असल्याचे मुख पत्र व 15-ए प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सीसीव्हीआयएस या संकेतस्थळावर अर्ज भरून झाल्यानंतर त्याची एक प्रत प्रिंट घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज समिती कार्यालयात जमा करावे. समिती कार्यालयात अर्ज सादर करतांना अर्जासोबत स्कॅन करून अपलोड केलेले सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक राहील.
जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आले आहे. अर्जदारांना यानंतर प्रकरणाची सद्यस्थिती, प्रकरणातील आक्षेप अर्जदारांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांक व ईमेल वर कळविण्यात येणार आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराच्या नोंदणीकृत ईमेल वर पाठविण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्राची प्रत समिती कार्यालयातून देण्यात येणार नाही. त्यामुळे अर्ज करतांना आपला ईमेल व मोबाईल क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीतून तयार होत असल्याने सीसीव्हीआयएस वर अर्ज भरतांना आपले नाव अचूक भरावे व पडताळणीही करावी. समितीने अर्जावर काही आक्षेप नोंदविल्यास अर्जदाराला त्याची पुर्तता सीसीव्हीआयएस प्रणालीव्दारे करावी लागणार असल्याने अर्जदाराने युजर आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावे.
विद्यार्थ्यांनी वरील सूचनांचे पालन करून सीसीव्हीआयएस प्रणालीवर परिपूर्ण अर्ज भरून अर्जाची छायाप्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जमा करावे, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य आर.डी. आश्राम यांनी केले आहे.