चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील नेरी – नवरगाव मार्गावर पी.एच.सी. चौकात पिकअप आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला होता. अपघात एवढा भीषण होता की पिकअप च्या धडकेत बी एस एफ चे जवानाने जागेवर श्वास सोडला.
अपघात घडवून आणणारा गाडी चालक मुकेश नागपुरे रा.भिवापूर जि. नागपूर याचेवर गुन्हा दाखल.
चिमुर पोलीसांनी घेतले आरोपीस ताब्यात संपूर्ण प्रकरणांचा तपास चिमुरचे ठाणेदार रविंद्र शिंदे पोलीस निरीक्षक चिमुर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक कांता रेजीवाड व पोलीस अंमलदार भरत घोळवे हे करीत आहेत.
सिंदेवाही तालुक्यातील पूनमचंद्र भगवान चौखे हा पेंढरी येथील रहिवासी असून समाजसेवा करत देशाची सेवा करणारा जवान होता. तो बी. एस.एफ. मध्ये वाघा बॉर्डरवर सेवेत होता. काही घरगुती कामानिमित्त ९ तारखेला अर्जीत रजेवर ३० दिवसांसाठी गावाकडे आला होता.
काही कामानिमित्त ते चिमुरला गेले असता परतीच्या प्रवासात अपघात होऊन ते स्वर्गवासी झाले. त्यामुळे पोलिस मुख्यालय चंद्रपूर तथा पोलीस स्टेशन सिंदेवाही व चिमुर यांच्या मार्फतीने स्वर्गीय पुनमचंद्र भगवान चौके यांना शोक सलामी देण्यात आली. त्यामधे बारा रावुंड चे फैरी हवेमध्ये झाडण्यात आली.
शोक सलामी साठी उपविभागीय अधिकारी संकपाल तालुका दंडाधिकारी गणेश जगदाळे पोलिस उपनिरीक्षक नेरकर, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक कांता रेजिवाड , पोलिस अंमालदार भरत घोळवेे,नागराज गेडाम सभापती, रमाकांत लोधे जिल्हा परिषद सदस्य व अनेक नामवंत व्यक्ती व जनसागर उसळला होता.