वासेरा गावात नळ कनेक्शन धारकांची दादागिरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

सिंदेवाही

आक्रोश खोब्रागडे
७५०७४९८२९६

जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वासेरा येथे नळ कनेक्शन धारकांना पाण्याची समस्या ही एप्रिल-२०२० महिन्यापासून चांगलीच विळखा घातली आहे.माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार कोणत्याही नळ कनेक्शन धारकांना नळाला मोटारपम्प लावून पाण्याचा उपसा करण्याचे परवानगी आदेश नाहीत. तरी सुद्धा गावातील काही नळ कनेक्शन धारक या नियमाचे उल्लंघन करून आपली दादागिरी दाखवून नळाला मोटार पम्प लावुन पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे चढ भागातील नळाला एकही थेंब पाणी येत नाही.गावातील विद्युत नळाला पाणी सोडण्याच्या नियोजित वेळेवर गेली तर चढ भागातील नळाला पाणी हे खात्रीपूर्वक येते.ह्याची खात्रीशीर तपासणी दै.आत्ताच एक्सप्रेस प्रतिनिधीनी केली आहे.काही नळाला लावलेल्या मोटरपम्प फ़क्त एकदा गावातील ग्रामसेवक कापकर यांनी स्वतः फिरून काही मोटारी जप्त केल्या.नंतर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अश्या दादागिरी करून नळाला मोटरपम्प लावणाऱ्या नळ कनेक्शन धारकांवर ग्रा.पं.वासेरा येथील ग्रामसेवक तथा पं.स.सिंदेवाही येथील गटविकास अधिकारी यांनी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने नियमाने कारवाई करावी अशी गावातील जनतेची मागणी आहे. गावात जर एखाद्या नागरिकाला प्रशासन हे मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी असमर्थ ठरत असेल तर त्या नागरिकांकडून कोणत्याही कराची वसुली करणे हे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. तेव्हा संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी त्वरीत दखल घेऊन वेळेवर उपाय योजना सुचवून अन्याय होत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावे.